बारामती(वार्ताहर): बारामती आणि परिसरात नियमित रक्तदान करणार्या रक्तदात्यांनी आपल्या माहितीसह इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड (सेंटर) बँकेशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे सचिव डॉ. अशोक दोशी यांनी केले आहे.
राज्य रक्त संक्रमण परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नियमित रक्तदान करणारे रक्तदाते ज्यांचे 50 वेळा, 75 वेळा आणि 100 वेळा रक्तदान झाले आहे. अशा रक्तदात्यांचा राज्य रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सन्मान होणार आहे त्यासाठी ज्यांचे 50 पेक्षा जास्त रक्तदान झाले आहे त्या नियमित रक्तदात्यांनी इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड बँक (सेंटर) बारामतीचे जनसंपर्क अधिकारी सोमनाथ कवडे मो.नं. 9096383959 यांना रक्तदान केलेले प्रमाण पत्र, किंवा रक्तगट कार्ड या कागदपत्रासह प्रत्यक्ष भेटावे असे आवाहन संस्थेचे सचिव डॉ अशोक दोशी यांनी केले आहे.