बारामती(वार्ताहर): युवकांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहणारे, त्यांच्या हक्क व कर्तव्यासाठी निर्भिडपणे लढणारा योद्धा जमीर अहमदखान पठाण वयाच्या पन्नाशी वर्षी त्यांचे अल्पश: आजाराने राहते घरी दु:खद निधन झाले.
दि.2 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 8.30 वा. फातिमा मशिद, कसबा बारामती येथे त्यांचा दफनविधी करण्यात आला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा व तीन भाऊ असा परिवार आहे.
ङ्कपठाणङ्ख या नावाने त्यांची आगळी वेगळी ओळख होती. मुस्लीम समाजातील युवकांचे प्रश्र्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी मनोमन प्रयत्न केला. सामुहिक बैठकीत त्यांनी कधीही मीपणा दाखविला नाही उलट प्रश्र्न समजून घेऊन त्यावर मार्ग कसा काढता येईल हे पाहिजे. लहान थोर असा भेदभाव त्यांनी कधीही केला नाही. वेळप्रसंगी त्यांनी हक्कासाठी बाह्यासुद्धा वर केल्या असा लढवय्या योद्धा समाजाने गमावला आहे. अंत्यविधीस आलेल्या शोकाकुलावरून त्यांचा चाहता वर्ग किती होता हे दिसत होते. सा.वतन की लकीरतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.