अशोक घोडके यांजकडून..
गोतोंडी(वार्ताहर): इंदापूर-बारामतीरोडलगत विठ्ठलनगर गोतोंडी या रस्त्याचे भूमिपूजन गावचे सरपंच गुरूनाथ नलवडे व काशिनाथआण्णा शेटे यांच्या शुभहस्ते दि.5 नोव्हेंबर रोजी संपन्न झाले.
सदरचे काम ग्रामपंचायत, जि.प.निधी व स्वयंरोजगारातून काम होणार असल्याचे सरपंच नलवडे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उपसरपंच परशुराम जाधव, पोलिसपाटील हरिभाऊ खाडे, नृसिंह प्रतिष्ठानचे अध्यक्ष मछिंद्रआप्पा चांदणे, पोपट नलवडे, युवराज मस्के, आप्पा पाटील, बापू पिसे, आबा मारकड, मल्हारी जाधव, पापत साहेब, ऍड.नलवडे, दत्तू चांदणे, छगन शेंडे, संतोष भोसले, शंकरदादा भोंग, गंगाराम शेंडे इ. मान्यवर व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.