अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी राहुल सोनवणे यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यामध्ये पार पडलेल्या बैठकीत पुणे जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष सुजाता सोनकांबळे व उपाध्यक्षपदी राहुल सोनवणे यांचेकडे जिल्ह्याचा पदभार सोपवण्यात आला.
यावेळी इतर कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली. राहुल सोनवणे हे इंदापूर तालुक्यातील तरडगावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्या कामाचा व कार्याचा अनुभव पाहता त्यांना भारतीय बौद्ध महासभेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यांमधून प्रत्येक भागातून मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राजरत्न आंबेडकरांनी भविष्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये कसे काम करावे या विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला इंदापूर येथील कार्यकर्ते उपस्थित होते.