अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): महाराष्ट्र शासन कृषी विभाग व शेतकरी, कामगार, बेरोजगार, अपंग हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने काझड (ता.इंदापूर) येथे तालुकास्तरीय महिला किसान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी मंडल कृषी अधिकारी विक्रम वाघमोडे, शेतकरी,कामगार,बेरोजगार, अपंग हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेशचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नवनाथ नरुटे-पाटील, कृषी पर्यवेक्षक राजू घुले, कृषी सहाय्यक शिवराज मचाले, सौ.प्रणिता ननावरे इ. मान्यवर उपस्थित होते.
विक्रम वाघमोडे यांनी फळबाग, गांडूळ खत युनिट, पी.एम.एफ.एम.ई, महाडीबीटी या योजनांविषयी महिला शेतकर्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी काझड गावातील महिला शेतकरी सौ.मनीषा झगडे, सौ.पुनम झगडे, सौ.सिंधुताई कुंभार, सौ.वनिता झगडे, सौ.सुनिता नरुटे, सौ.फुलाबाई नरुटे, श्रीमती.रुपाली नरूटे, श्रीमती.ताराबाई नरुटे, श्रीमती.चंद्रभागा नरुटे, सौ.लताताई कुंभार, सौ.नंदाताई झगडे आदी महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सेवक सौ.शुभांगी बरळ यांनी केले तर शेवटी आभार सौ.प्रणिता ननावरे यांनी मानले.