बारामती(वार्ताहर): नशापाणी व गाडीवर शायनिंग करणार्या युवकांतर्फे सत्कार स्वीकारण्यापेक्षा घाम गाळून शरीरसौष्ठव बनविणार्या व आपल्या कुटुंबाचे नावलौकीक करणार्या तरूणांकडून सत्कार होतो याचा खुप अभिमान असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेलचे पुणे जिल्हा अध्यक्ष नितीनकुमार शेंडे यांनी बोलताना व्यक्त केले.
नितीनकुमार शेंडे व पत्रकार तैनुर शेख यांचा संयुक्तीक वाढदिवस अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळ संचलित, आदरणीय श्री.पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब फिटनेस हेल्थ क्लबतर्फे केक कापून, पुष्पगुच्छ देवून साजरा करण्यात आला.
यावेळी या क्लबचे प्रशिक्षक संतोष जगताप, उद्योजक दिपक कुदळे, बारामती तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष दिपक बर्गे, सामाजिक कार्यकर्ते सतिश माने, विजय नलगे इ. मान्यवर उपस्थित होते.
शेंडे पुढे म्हणाले की, आमच्या काळात गावठी व्यायाम होता. नियमित व्यायाम केल्यास शरीर पिळदार राहते. शरीर चांगले असेल तर मन चांगले राहते आणि मन चांगले असेल तर वाईट विचार येत नाही आणि माणुस सन्मार्गाला जातो. आई-वडिलांनी तळहाताला आलेल्या फोडाप्रमाणे तुम्हाला जपलेले असते त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करताल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. या जिमचे प्रशिक्षक संतोष जगताप यांनी तळागाळातील मुलं घडविली आहेत. त्यामुळे आपण कितीही मोठं झाला तरी गुरूला विसरू नका कारण व्यायामाची एवढी मोठी संपत्ती त्यांनी दिली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शेवटी प्रशिक्षक संतोष जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले.