बारामती(वार्ताहर): कोणताही पक्ष असो त्या पक्षाचा खरा आत्मा त्या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असतो. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला असे निष्ठावंत कार्यकर्ते निर्माण होणे अशक्य आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या समर्थनाथ व आयकर विभाग (एन.सी.बी.) आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी अजितदादा युवाशक्तीचे संस्थापक अध्यक्ष, माजी नगरसेवक अभिजीत भिमराव काळे यांनी युवकांची फळी घेऊन निषेधा ठिकाणी उत्स्फूर्त घोषणा देत आले. एवढंच नव्हे तर शेतकर्यांवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात भारत बंद दिवशी पक्षातर्फे आयोजित निषेध कार्यक्रमात सहभागी होऊन जबाबदारी पार पाडली.
पवार साहेबांच्या राजकारणापासून पवार कुटुंबियांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे बारामती तालुक्यात काही कुटुंब आहेत त्यापैकी बारामती शहरातील काळे कुटुंब आहे. माजी उपनगराध्यक्ष कै.भिमराव काळे यांचे सुपूत्र माजी नगरसेवक अभिजीत काळे हे कट्टर अजितदादांचे सच्चे कार्यकर्ते आहेत. अशा कार्यकर्त्यांमुळे पक्षाला व पक्षाच्या नेत्यांची इच्छाशक्ती, उर्जा वाढत असते. पक्षाला एक प्रकारे बळकटी येत असते.

मध्यंतरी अभिजीत काळे यांनी दादांच्या वाढदिवसानिमित्त स्वत:च्या रक्ताने शुभेच्छा दिल्या होत्या. एवढे प्रेम ना.अजितदादा पवार यांच्यावर ते करीत आहेत. बारामती शहरात विविध संस्थावर काम करणारे संचालक, सदस्य होऊन गेले ते कधीही पक्षाच्या कोणत्याही कार्यात सक्रीय झाले नाही. मात्र एकमेव माजी नगरसेवक आहेत प्रत्येकवेळी अजितदादांसाठी युवक घेऊन रस्त्यावर निषेध, आंदोलन करतात, विरोधकांना प्रतिक्रीया देतात. बारामती शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ पाहता पक्षाला असे पक्षाला निष्ठावंत कार्यकर्ते निर्माण होणे अशक्य आहे असेही निषेधाप्रसंगी नागरीक बोलताना व्यक्त करीत होते.