बारामती(वार्ताहर): राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी विकासात्मक दृष्टीकोन ठेवत बारामतीचा चेहरा-मोहरा बदलला आहे. चौफेर विकास पाहता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते सुजीत जाधव व मित्रमंडळातर्फे निरा-डावा कालव्यालगत 101 वृक्ष प्रदान केल्याने ना.पवार यांनी सुजीत जाधव यांचे कौतुक केले.
रविवार दि.10 ऑक्टोबर 2021 रोजी नगरपालिकेस महोगनी जातीचे 101 वृक्ष देण्यात आले. ना.पवार यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करुन या मोहिमेस सुरुवात करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, गटनेते सचिन सातव, नगरसेवक अतुल बालगुडे, विशाल जाधव, संदीप पाटील, नानासाहेब साळवे, गणेश भोसले, अभिजीत शेळके व अविनाश सूर्यवंशी उपस्थित होते.