खुळे चौक सुशोभिकरण कामामध्ये फेररचना करण्याची मागणी

अशोक घोडके यांजकडून…
गोतंडी(वार्ताहर): इंदापूर शहरात महत्वाचे ठिकाण समजला जाणारा खुळे चौक सुशोभिकरणाचे काम चुकीच्या पद्धतीने रचना केली असल्याने या कामामध्ये फेररचना करण्याची मागणी इंदापूर तालुका कॉंग्रेस अध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी इंदापूर नगरपालिकेला एका निवेदनाद्वारे केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून प्रस्तावित खुळे चौक सुशोभिकरण होणार आहे. पुणे-सोलापूर रोडकडून येणार्‍या वाहनांना विद्या प्रतिष्ठानकडे जाण्यासाठी योग्य पद्धतीने वळण नसून भविष्यात या ठिकाणी अपघात होणे नाकारू शकत नाही. त्या ठिकाणी असलेल्या गोण्यामुळे अपघात होत आहेत या गोण्या हटवून खुळे चौक येथील प्रस्तावित सुशोभिकरणाचे काम योग्य रचना करून करण्यात यावे असेही निवेदनात म्हणाले आहे.

या वेळी शहराध्यक्ष चमन बागवान, डॉ.संतोष होगले, जाकीर काझी, मिलिंद साबळे, महादेव लोंढे, संदिप शिंदे, आकाश पवार, युवराज गायकवाड, सुफीयान जमादार, सचिन गायकवाड उपस्थित होते.

नेहरू चौकातील खड्डे दुरुस्त न झाल्यास खड्‌ड्यांमध्ये वृक्षारोपण करणार….
इंदापूर शहरातील नेहरू चौकात रस्त्यावरती पडलेल्या खड्‌ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याचे दिसून येत आहे ते खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत अन्यथा कॉंग्रेस पक्ष त्याच खड्‌ड्यांमध्ये वृक्षारोपण करेल अशा इशार्‍याचे निवेदन इंदापूर नगरपालिकेला देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!