पुणे(मा.का.): राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासना कडून अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसीलदार श्री. कुराडे, नायब तहसीलदार श्रावण ताठे, आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.