शर्मिलावहिनींच्या स्वभावाला व कार्याला साजेसा असा कार्यक्रम – सौ.पौर्णिमा तावरे

बारामती(वार्ताहर): शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा सौ.शर्मिला (वहिनी) पवार यांच्या स्वभावाला व ते करीत असलेल्या सामाजिक कार्याला साजेसा असा कार्यक्रम असल्याचे मत बारामती नगरपरिषदेच्या अध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे यांनी व्यक्त केले.

दि.1 ऑक्टोबर रोजी बारामती नगरपरिषद प्रभाग क्र.13 चे नगरसेवक व बांधकाम सभापती सत्यव्रत (सोनू) काळे यांनी सौ.शर्मिला (वहिनी) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 100 गरजू महिलांना साड्या व 100 ज्येष्ठ नागरीकांना ब्लॅकेंट वाटप कार्यक्रम प्रसंगी सौ.तावरे बोलत होत्या.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बारामती शहर अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, बा.न.प.चे गटनेते सचिन सातव, नगरसेवक नवनाथ बल्लाळ, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बारामती शहर उपाध्यक्ष सिद्धनाथ भोकरे, मुस्लीम बँकेचे संचालक आलताफ सय्यद, माजी नगरसेवक अनिल कदम, पांडूरंग चौधर इ. मान्यवर उपस्थित होते.

पुढे सौ.तावरे म्हणाल्या की,शर्मिलावहिनींचे समाजाभिमुख उपक्रम असतात. 80% समाजकारण तर 20% राजकारण ते करीत आलेल्या आहेत. शरयु फौंडेशनच्या माध्यमातून त्यांनी मोठ-मोठे उपक्रम हाती घेऊन ते मार्गी लावलेले आहेत.

यावेळी सत्यव्रत काळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली, शेवटी आभार व्यक्त केले. यावेळी बहुसंख्य महिला, ज्येष्ठ नागरीक, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!