वहिणीसाहेब…

जिथे कमी, तिथे आम्ही हे ब्रीद वाक्य घेऊन प्रत्येक क्षेत्रात कार्य करीत असणार्‍या शरयू फौंडेशनच्या अध्यक्षा सौ.शर्मिलावहिणी पवार आहेत. 1 ऑक्टोबर त्यांचा वाढदिवस गाव-वाडी, वस्त्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

शर्मिलावहिणी यांच्या वाढदिवसानिमित्त तळागाळातील कार्यकर्ते रक्तदान शिबीर, निबंध स्पर्धा इ. लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात. प्रत्येकाच्या सुख-दु:खात हजेरी लावणे, महिलांच्या अंगी असणार्‍या कला, गुणांना वाव देणे. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्‍यांना प्रोत्साहन देणे. पर्यावरण व आपली संस्कृती जपणे यावर त्यांचा जास्तीचा भर असतो. शरयू फौंडेशनच्या वतीने त्यांनी समाजोपयोगी कामे केली या कामातून फौंडेशनला लोकं जोडत गेली आणि या कार्यातून अतूट असे युवक, युवती, महिला व पुरूषांचे जाळे निर्माण झाले आहे.

त्यांचे सतत म्हणणे असते कोणत्याही कामासाठी लोकसहभागासाठी शरयू फौंडेशन चार पावले पुढे येऊन मदत करेल. पवारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांची व नागरीकांची पाण्याची सोय व्हावी म्हणून त्यांनी फौंडेशनच्या माध्यमातून हातपंप बसवून त्या हातपंपाचे लोकार्पण केले. वृक्ष लागवड संवर्धन करण्यास फौंडेशनच्या वतीने सतत उपक्रम राबविण्यात येतो. माती, शेण व पाणी एकत्र करून सीड बॉल तयार करून त्यामध्ये बिया लावून प्रत्येक गावात वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला जातो. दिव्यांगाचा आत्मविश्र्वास वाढावा म्हणून मानवतेच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास कोणीही स्वत:ला दिव्यांग समजण्याचे कारण नाही. दिव्यांगावर मात करून कला, क्रीडा क्षेत्रासह विविध टप्प्यांवर यशस्वी होताल त्यामुळे आत्मविश्र्वासाची दृष्टी डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने एक पाऊल पुढे टाकले पाहिजे असे त्यांचे सतत म्हणणे असते.

ओढा-नाला खोलीकरण, जलसंधारण इ. कामांसाठी शरयू फौंडेशनचे खूप मोठे योगदान आहे. कित्येक गोर-गरीब लोकांना शरयू फौंडेशनच्या माध्यमातून मोफत विहीर खोदाई करून दिल्या आहेत. यामुळे प्रत्येकाला वाटते आपली शेती ओलीताखाली यावी त्याचा आनंद गोर-गरीबांनी घेतला व भरभरून शरयु फौंडेशनला शुभेच्छा देत आहेत. शरयू फौंडेशनच्या अध्यक्षा शार्मिलावहिणींसह इतर सदस्य अशा श्रमदानाच्या कामात अग्रेसर असतात. ओढा खोलीकरण व जलसंधारण कामास मोफत पोकलेन मशिनसुद्धा दिली जाते. या कामातून कर्‍हावागज, आंबी, भिलारवाडी इ. गावे पाणीदार झालेले आहेत. शरयु फौंडेशन समाजात काम करीत असताना वन्यप्राण्यांचा सुद्धा तेवढाच विचार करीत आलेली आहे. एवढं मोठे काम शरयु फौंडेशनच्या माध्यमातून शर्मिलावहिणींनी उभे केले आहे.

कोरोना काळात शरयु फौंडेशनच्या सदस्यांनी जनजागृती केली. मदतीचा हात पुढे केला, कोणालाही आपण एकटं आहे असे भासू दिले नाही. प्रत्येकाला धीर दिला पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आज प्रत्येकाला वाटते पैसे देवून घेऊन नाही तर संकटकाळी जो एकमेकांना आधार दिला जातो तो कशातही मोजता येत नाही असाच प्रकार शरयुचे सदस्य व शर्मिलावहिणी करीत आलेल्या आहेत. नुसते आश्र्वासन दिले जात नाही तर शरयु फौंडेशनतर्फे प्रत्येक्षात काम करून दाखविले जाते.

महिलांमध्ये जी काही भिती आहे ती दूर करण्यासाठी शरयु फौंडेशनने महिला धोरण-2014 नुसार समाजात काम करण्याची गरज आहे. आजही महिलांचा आवाज दाबला जातो, त्यांना खंबीर अशी साथ मिळत नाही. वेळ पडल्यावर त्यांच्या पाठीशी कोण उभे राहत नाही. अजुन किती दिवस अन्याय अत्याचार सहन करायचा हा प्रश्र्न त्यांच्या मनी सतत धगधगत असतो.

शरयु फौंडेशनने शरयु यशोगाथा संवाद शून्यातून विश्र्व निर्माण केलेल्या मान्यवरांशी ऑनलाईन संवाद हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमास भरभरून प्रतिसाद मिळत आहे. शर्मिलावहिणींनी खूप मोठे सामाजिक कार्यातून काम उभे केले आहे. त्यांच्या कामातून युवा पिढी बोध घेत आहेत व कामात सहभागी होत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!