काटेवाडी(वार्ताहर): येथील सुमन दत्तात्रय काटे-देमशुख (धनी) यांचे वयाच्या 84 व्या वर्षी रहाते घरी वृद्धापकाळाने निधन झाले. शुक्रवार दि.24 सप्टेंबर 2021 रोजी सायं.5.30 वा. त्यांच्या पार्थिवावर काटेवाडी सार्वजनीक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रगतशिल शेतकरी विजयसिंह (भाऊसाहेब) काटे यांच्या आई होत.
सर्वांची खुशाली विचारणे, लहान-मोठ्यांना प्रेमाणे बोलणे, मनमिळावू स्वभावामुळे त्यांची वेगळी ओळख होती. शेवटपर्यंत त्यांना कोणत्याही व्याधी नव्हत्या किंवा गोळी नव्हती हे खूप महत्वाचे होते.
त्याच्या जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली होती.अंतयात्रेत राजकीय, सामाजिक, शैक्षणिक इ. क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या पश्र्चात पती दत्तात्रय काटे, मुलगा विजयसिंह (भाऊसाहेब) काटे व एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
दशक्रीया विधी रविवार 3 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 वा. जुन्या तहसिल कचेरी शेजारी, आप्पासाहेब पवार मार्ग, बारामती याठिकाणी होणार आहे.