वतन की लकीर (ऑनलाईन): पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 29 हजार 367 रुग्णांपैकी 11 लाख 2 हजार 950 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ऍक्टीव रुग्ण 7 हजार 700 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 717 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.66 टक्के इतके आहे तर बरे होणार्या रुग्णांचे प्रमाण 97.66 टक्के आहे.
काल बारामतीत 381 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 15 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकही रुग्ण प्रतिक्षेत नाही. इतर तालुक्यात 02 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
काल खाजगी प्रयोगशाळेत 63 रूग्णांची आरटी-पीसीआर तपासणी केली असता 05 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
1485 रुग्णांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 27 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहे.
म्युकर मायकॉसिसचे एकुण 40 रूग्णांपैकी बारामती तालुक्यातील 31 तर इतर तालुक्यातील 09 रूग्ण आहेत. यापैकी उपचार घेणारे 04 रूग्ण आहेत.
काल दिवसभरात बारामतीत एकूण 47 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बारामतीत 29 हजार 568 रुग्ण असून, बरे झालेले 28 हजार 759 आहे. आज डिस्चार्ज 60 असुन, आतापर्यंत मृत्यू झालेले 739 असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी कळविले आहे.
संपूर्ण जगभरात 21 कोटी 94 लाख 56 हजार 675 एकुण रूग्ण असुन मृतांची संख्या 45 लाख 47 हजार 782 आहे. प्रति एक दशलक्ष लोकांमागील रूग्ण संख्या 28 हजार 223 आहे.
भारतात 3 कोटी 33 लाख 81 हजार 728 एकुण रूग्ण असुन मृतांची संख्या 4 लाख 44 हजार 248 आहे. प्रति एक दशलक्ष लोकांमागील रूग्ण संख्या 24 हजार 536 आहे. एका दिवसात भारतात 34 हजार 403 रूग्ण सापडतात.
तर महाराष्ट्रात एकुण रूग्ण 65 लाख 11 हजार 525 असुन मृतांची संख्या 1 लाख 38 हजार 322 आहे. प्रति एक दशलक्ष लोकांमागील रूग्ण संख्या 57 हजार 027 आहे. एका दिवसात 3 हजार 595 रूग्ण सापडतात.