बारामती(वार्ताहर): राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बारामती शहर उपाध्यक्ष ऍड.अविनाश गायकवाड यांची शासकीय दक्षता समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेबद्दल राष्ट्रवादी भवन, कसबा बारामती येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
पक्षाचे वतीने शाल श्रीफळ व वृक्ष रोप देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचे पी.ए.हनुमंत पाटील, माळेगाव कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे, पंचायत समीती सभापती, खरेदी विक्री संघ चेअरमन, दुध संघ चेअरमन, तालुकाध्यक्ष संभाजीनाना होळकर, शहराध्यक्ष इम्तियाजभाई शिकीलकर इ. मान्यवर उपस्थित होते.