अशोक घोडके यांजकडून..
गोतंडी(वार्ताहर): आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा खरा इतिहास येणार्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे असे प्रतिपादन गोतंडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच काशिनाथ शेटे यांनी केले.
गोतंडी ग्रामपंचायत येथे आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची 230 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता कोरोना चे नियम पाळून जयंती साजरी करण्यात आले.
ते पुढे म्हणाले कर्मकांडापासून दूर राहा, मुलांना शिक्षण देऊन उच्चशिक्षित करा, महापुरुषांचे विचार त्यांच्या मनामध्ये रुजवा तरच भविष्य घडेल.
यावेळी गावचे सरपंच गुरुनाथ नलवडे, उपसरपंच परशुराम जाधव, ग्रामसेवक श्री.लोणकर, आप्पा पाटील, हरी भाऊ खाडे, पापड साहेब, छगन शेंडे, रवी कांबळे, बाबा मारकड, बापू पिसे, पोपट नलवडे, भैया बिबे, महेश पवार, अनिल खराडे व गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.