शासकीय कार्यालयांनी कर्मचार्‍यांची सेवा व वेतन विषयक माहिती ऑनलाईन अद्यावत करावी -जिल्हा सांख्यिकी अधिकारी नि.चं.जोशी

पुणे(मा.का.):अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांचेकडून महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचार्‍यांचा सर्वकष माहितीकोष अद्यावत करण्याबाबतची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय कार्यालयांनी त्यांचेकडील कर्मचा-यांची दिनांक 1 जुलै 2021 या संदर्भ दिनांकास अनुसरुन सेवा व वेतन विषयक माहिती https://des.2mahaonline. gov.in/CGE या संकेतस्थळावर ऑनलाईन अद्यावत करावी, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी नि.चं.जोशी यांनी केले आहे.

पुणे जिल्हयातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी संगणकीय आज्ञावलीचे Username व Password जिल्हा सांख्यिकी कार्यालय, पुणे यांच्याकडून उपलब्ध करून घ्यावेत. माहिती अद्यावत करून त्याबाबतचे पहिले प्रमाणपत्र जिल्हा सांख्यिकी अधिकारी, पुणे यांचेकडून प्राप्त करून घेऊन माहे नोव्हेंबर 2021 देय डिसेंबर 2021 वेतन देयकासोबत व माहिती बरोबर असल्याबाबतचे दुसरे प्रमाणपत्र माहे फेब्रुवारी 2022 देय मार्च 2022’ च्या वेतन देयकासोबत जोडलेले नसल्यास अशा कार्यालयांची वेतन देयके कोषागार कार्यालयांनी पारित करण्यात येऊ नये, अशा सूचना नियोजन विभाग यांच्याकडील 26 जुलै 2021 च्या शासन परिपत्रकांन्वये निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तरी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी नोंद घ्यावी व विहित मुदतीत शासकीय कर्मचार्‍यांचा माहितीकोष अद्यावत करण्याची कार्यवाही करावी.

अधिक महिती व संपर्कासाठी जिल्हा सांख्यिकी कार्यालय, पुणे, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, 25 शुक्रवार पेठ, महात्मा फुले मंडईसमोर, स्वामी समर्थ मठाशेजारी, पुणे-02 दुरध्वनी क्र.-020-24453236 des.dsopunegmail.com, dso.punehotmail.com येथे संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी नि.चं.जोशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!