वतन की लकीर (ऑनलाईन): बारामतीत पुन्हा एकदा कोरोना बाधीचा आकडा सत्तरी पार केला आहे. बारामतीत दि.30 ऑगस्ट 2021 रोजी दिवसभरात बारामती शहरातून 41 तर ग्रामीण भागातून 33 रुग्ण असे मिळून 74 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.
काल बारामतीत 560 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 43 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकही रुग्ण प्रतिक्षेत नाही. इतर तालुक्यात 11 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
काल खाजगी प्रयोगशाळेत 48 रूग्णांची आरटी-पीसीआर तपासणी केली असता 04 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 1665 रुग्णांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 27 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला आहे. म्युकर मायकॉसिसचे एकुण 40 रूग्णांपैकी बारामती तालुक्यातील 31 तर इतर तालुक्यातील 09 रूग्ण आहेत. यापैकी उपचार घेणारे 04 रूग्ण आहेत.
काल दिवसभरात बारामतीत एकूण 74 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बारामतीत 28 हजार 640 रुग्ण असून, बरे झालेले 27 हजार 614 आहे. आज डिस्चार्ज 78 असुन, आतापर्यंत मृत्यू झालेले 717 असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी कळविले आहे.
संपूर्ण जगभरात 21 कोटी 66 लाख 64 हजार 624 एकुण रूग्ण असुन मृतांची संख्या 45 लाख 05 हजार 400 आहे. प्रति एक दशलक्ष लोकांमागील रूग्ण संख्या 27 हजार 864 आहे.
भारतात 3 कोटी 27 लाख 37 हजार 939 एकुण रूग्ण असुन मृतांची संख्या 4 लाख 38 हजार 210 आहे. प्रति एक दशलक्ष लोकांमागील रूग्ण संख्या 42 हजार 909 आहे. एका दिवसात भारतात 24 हजार 063 रूग्ण सापडतात.
तर महाराष्ट्रात एकुण रूग्ण 64 लाख 56 हजार 939 असुन मृतांची संख्या 1 लाख 37 हजार 157 आहे. एका दिवसात महाराष्ट्रात 4 हजार 666 रूग्ण सापडतात.