वतन की लकीर (ऑनलाईन): पुणे, सातारा, सांगली, नगर, सोलापूर, उस्मानाबाद आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येचा आलेख वाढतच आहे. नंदुरबार जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण उपचाराधीन नाही. धुळे, वाशिम, यवतमाळ, भंडारा, वर्धा व गोंदिया या सहा जिल्ह्यांत उपचाराधीन रुग्णांची संख्या 10 पेक्षाही कमी आहे.
एवढी जनजागृती करूनही कोरोना संसर्गाची कोणतीही लक्षणे दिसल्यानंतर लगेच वैद्यकीय उपचार करून घेण्याकडे अजूनही ग्रामीण भागातील लोकांचा कल दिसत नाही. पुणे विभागातील 18 लाख 37 हजार 423 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी तर विभागात कोरोना बाधित 19 लाख 6 हजार 195 रुग्ण आहेत.
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 273 रुग्णांपैकी 10 लाख 73 हजार 862 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. क्टीव रुग्ण 7 हजार 997 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 414 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.67 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.60 टक्के आहे.
बारामतीत दि.18 ऑगस्ट 2021 रोजी दिवसभरात बारामती शहरातून 20 तर ग्रामीण भागातून 44 रुग्ण असे मिळून 64 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.
काल बारामतीत 467 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 22 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकही रुग्ण प्रतिक्षेत नाही. इतर तालुक्यात आठ रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
काल खाजगी प्रयोगशाळेत 52 रूग्णांची आरटी-पीसीआर तपासणी केली असता 08 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 977 रुग्णांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 34 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला आहे. म्युकर मायकॉसिसचे एकुण 39 रूग्णांपैकी बारामती तालुक्यातील 31 तर इतर तालुक्यातील 08 रूग्ण आहेत. यापैकी उपचार घेणारे 02 रूग्ण आहेत.
काल दिवसभरात बारामतीत एकूण 64 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बारामतीत 27 हजार 869 रुग्ण असून, बरे झालेले 26 हजार 819 आहे. आज डिस्चार्ज 30 असुन, आतापर्यंत मृत्यू झालेले 704 असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी कळविले आहे.
दि. 17 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारी :-
सातारा जिल्हा :- सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 31 हजार 537 रुग्णांपैकी 2 लाख 17 हजार 605 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 302 आहेत. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 630 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा:- सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 86 हजार 751 रुग्णांपैकी 1 लाख 77 हजार 119 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 939 आहेत. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 693 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा :- सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 86 हजार 160 रुग्णांपैकी 1 लाख 75 हजार 779 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 486 आहेत. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 895 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा :- कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 1 हजार 474 रुग्णांपैकी 1 लाख 93 हजार 58 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 784 आहेत. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 632 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ :- कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 2 हजार 720 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 683, सातारा जिल्ह्यात 739, सोलापूर जिल्ह्यात 535, सांगली जिल्ह्यात 580 तर कोल्हापूर जिल्ह्यात 183 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण :- पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 3 हजार 907 आहे. पुणे जिल्हयामध्ये 802, सातारा जिल्हयामध्ये 1 हजार 274, सोलापूर जिल्हयामध्ये 708, सांगली जिल्हयामध्ये 680 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 443 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण:- आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 42 लाख 12 हजार 764 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 19 लाख 6 हजार 195 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.