बारामती(वार्ताहर): म.ए.सो.चे कै.ग.भि.देशपांडे माध्यमिक विद्यालय बारामती विद्यालयात भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोविड योद्धे डॉ.संदीप भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक उमेद सय्यद होते.
मातीशी नाळ जोडणारे विद्यार्थी निर्माण करणारी, भारताच्या संस्कृतीची जपणूक करणारे विद्यार्थी घडविणारी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही एकमेव संस्था आहे असे गौरवोद्गार यावेळी प्रमुख पाहुण्यांनी काढले. तसेच स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करताना आपल्याला समृद्ध भारत निर्माण करायचा आहे. माणसाने माणसासारखे जर वागले तर भारतीय संस्कृती चा आदर्श जगासमोर राहील आणि तरुणांच्या कार्यक्षमतेवर भारत एक दिवस जागतिक महासत्ता बनेल असे मत विद्यालयाचे मुख्याध्यापक उमेद सय्यद सर यांनी व्यक्त केले . संस्था पदाधिकारी यांनी पाठवलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा मुख्याधापकांनी वाचून दाखवल्या. या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रसारण करून प्रशालेच्या सर्व विद्यार्थ्यांना कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आले होते .
या कार्यक्रमास संस्था समन्वयक पुरूषोत्तम कुलकर्णी , संदीप देशपांडे , प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता चव्हाण , पूर्व प्राथमिक मुख्याध्यापिका अनिता तावरे , पर्यवेक्षक राजाराम गावडे , धनंजय मेळकुंदे , शेखर जाधव तसेच शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी , पालक वृंद उपस्थित होते .