बारामती: तालुक्यातील भाजपाचे धडाडीचे कार्यकर्ते साजन अडसुळ यांची भाजपा पुणे जिल्हा ग्रामीण अनु.जाती मोर्चा चिटणीसपदी निवड करण्यात आलेली आहे.
अनु.जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव यांच्या शुभहस्ते भाजपा जिल्हा कार्यालय पुणे या ठिकाणी नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. या वेळी अनु.जाती मार्चाचे जिल्हाध्यक्ष मयुर कांबळे अक्षय गायकवाड, शैलेश खरात, सागर भिसे,गजेंद्र भालेराव,उत्तम कांबळे इ.पदाधिकारी उपस्थित होते.
अनु.जाती मोर्चाचे प्रदेश चिटणीस यशपाल भोसले मार्गदर्शनाखाली बारामती शहर व तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे संघटन व विस्तार फार मोठ्या प्रमाणात करणार असल्याचे अडसुळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
अडसुळ हे पक्षाच्या प्रत्येक आंदोलना मध्ये कार्यक्रमा मध्ये सक्रीय सहभाग घेवून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी सतत कार्यरत असतात. या निवडीमुळे बारामती भाजपा कार्यकर्त्यांमध्ये विशेषत: तरूणांमध्ये उत्साहाचे वातावरण झालेले आहे.