बारामती(वार्ताहर): साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड बारामती व बालकल्याण केंद्र यांच्या वतीने आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनाने करण्यात आली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले आरोग्य शिबिराचे उद्घाटन जि.प.बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने व बा.न.प.च्या नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, गटनेते सचिन सातव, नगरसेवक सुनील सस्ते, बालरोग तज्ञ डॉ.अनिल मोकाशी, नगरसेविका डॉ.सुहासिनी सातव, पो.कॉ. बापू जगदाळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
मोफत आरोग्य शिबिर मध्ये डॉ.साकेत जगदाळे (डेंटल तपासणी व उपचार) डॉ.रोहन अकोलकर (फिजिओथेरपी तपासणी) श्री गणेश भोंग व सौ प्रियंका भोंग (शुगर तपासणी), सर्व तज्ञ डॉक्टरांचे खूप सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे आयोजन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दीपक भराटे, उपजिल्हा अध्यक्ष प्रशांत तावरे, शहराध्यक्ष विकास खोत, पोलीस मित्र संघटना बारामती तालुका अध्यक्ष सुरज तावरे, अप्पासाहेब पलांडे, जिजाउ ब्रिगेडचे अध्यक्षा प्रा.सुषमा जाधव,उपाध्यक्ष प्रा.शारदा मदने, सचिव शीलाराणी रंधवे , कार्याध्यक्षा विद्याराणी चव्हाण, कार्याध्यक्षा अल्पना पलांडे तसेच बालकल्याण केंद्राचे व्यवस्थापक गौतम मोकाशी, बालकल्याण केंद्राचे सचिव संदीप मुळीक, चि. संचित मदने , चि. प्रितम गुळूमकर यांनी केले. या शिबिराचा लाभ 145 लोकांनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा मदने प्रस्ताविक सुषमा जाधव तर आभार विद्याराणी चव्हाण यांनी मानले.