बारामती(वार्ताहर): रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या अध्यक्षपदी संजय दुधाळ तर उपाध्यक्षपदी अलीअसगर बारामतीवाला तर सचिवपदी रविकिरण खारतोडे, खजिनदपदी पार्श्वद्र फरसोले यांची निवड करण्यात आली.
जिल्हा सदस्य संचालक रो.शितल शहा, रो.स्मिता शितोळे व सहाय्यक राज्यपाल रो.ज्ञानदेव डोंबाळे यांच्या उपस्थित पदग्रहण सोहळा संपन्न झाला.
रो. शितल शहा मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, कोव्हिड काळात रोटरीने सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण व हॅप्पी स्कूल अशा विविध क्षेत्रात कामे केलेली आहेत.
नवीन वर्षात बारामती क्लबच्यामार्फत हॅप्पी स्कूल, हॅप्पी व्हिलेज, वृक्षारोपण तसेच वैद्यकीय क्षेत्रात विविध कामे बारामती व परिसरात करण्यात येतील असे आश्वासन ज्ञानेश्वर डोंबाळे यांनी दिले.
या कार्यक्रमाच्या वेळी अतुल गांधी यांचा कोकण पूरग्रस्त भागातील लोकांना रोटरी मार्फत नवीन कपडे व जॅकेट्स दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी मावळते अध्यक्ष डॉ हनमंतराव पाटील यांनी मागील वर्षीच्या कामांचा आढावा घेतला.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष संजय दुधाळ म्हणाले, नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या माध्यमातून सर्वांना बरोबर घेऊन विविध सामाजिक कामे वृक्षारोपण हॅप्पी स्कूल वैद्यकीय क्षेत्रात भरीव कामे करण्याचा निर्धार व्यक्त केला.
रोटरी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष शेखर मेहता यांच्या नियोजनामध्ये साक्षरता मिशन व महिला सबलीकरणामध्ये रोटरी मार्फत वेगवेगळे सेवा प्रकल्प केले जातील. जिल्हा संचालक रो.पंकज शहा यांच्या पंखांना बळ देऊन जिल्ह्यात रोटरी क्लब बारामतीचे नाव उज्वल करू या व त्यांच्या म्हणण्यानुसार छेींहळपस ळी खािेीीळलश्रश ने सुरुवात करू या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षवर्धन पाटील व सावळे पाटील यांनी केले.
यावर्षी रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या संचालक मंडळामध्ये अलीअसगर बारामतीवाला, पार्श्वद्र फरसोले, विजय इंगळे, स्वप्नील मुथा, हर्षवर्धन पाटील, सुशील जाधव, अतुल गांधी, दर्शना गुजर, निखिल मुथा, डॉ. शशांक जळक, प्रतिक दोशी, प्रीती पाटील,दत्ता बोराडे, किशोर मेहता, कौशल शहा यांची निवड करण्यात आली नूतन सचिव रविकिरण खारतोडे यांनी आभार व्यक्त केले.