पोस्ट पडली आणं ठिणगी उठली…

म्हटलं जाते की, सोशल मिडीयावर सत्य घटना येत नाही, त्यावर विश्र्वास ठेवू नये. मात्र, काही विचार करायला लावणार्‍या पोस्टमुळे पोस्ट वाचून ठिणगी उठल्याशिवाय राहत नाही. पोस्ट कोणी टाकली यावर सुद्धा जास्त अवलंबिले जाते. ङ्गबारामतीमध्ये गोरं गरीब दुकानदार, उद्योजक, छोटे मोठे व्यापारी ह्यांच्यासाठी एक पेरलल व्यापारी महासंघाची गरज की जी ह्या सगळ्यांच्या न्याय हक्कासाठी लढेल. जर पुणे चालू होऊ शकत तर बारामती का नाही.ङ्घ ही पोस्ट पडली असता 218 जणांनी लाईक करून 58 कमेंट आलेल्या आहेत.

बारामती व्यापारी महासंघाच्या कामाबाबत बोट दाखविले जात आहे. खरंच व्यापारी महासंघ गोर-गरीब दुकानदारांचा विचार करीत नाही का? व्यापारी महासंघाची मासिक बैठक कधी होते? दरवर्षी सर्वसाधारण सभा होते का? महासंघाच्या सलग्न असणारे विविध विभाग आहेत त्या-त्या विभागाचे अध्यक्ष सुद्धा केलेले आहेत त्या विभाग अध्यक्षांची बैठक तरी होते का? व्यापार्‍यांच्या हाकेला धावणारा व्यापारी महासंघ आहे का? बारामतीच्या घडामोडीत व्यापारी महासंघाला विचारात घेतले जाते का? व्यापारी महासंघाचा प्रतिनिधी कोणत्याही संस्थेवर प्रतिनिधी करताना दिसत नाही. व्यापारी महासंघाला बारामतीतून दुय्यम स्थान मिळते का? व्यापारी महासंघाच्या अध्यक्षाला आमदार, खासदार किंमत देतात का? अशा विविध प्रश्र्नाने व्यापारी, गोर-गरीब दुकानदार व सर्वसामान्य ग्राहकांना पडलेला खोचक प्रश्र्न आहे.

वरील सर्व बाबींचा विचार केला असता, शाळकरी, महाविद्यालयीन मुलांच्या सुद्धा मनात बारामती व्यापारी महासंघाच्या कामकाजाबाबत प्रश्र्न चिन्ह उपस्थित होईल. कोरोना काळात वेळोवेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सर्व व्यापार्‍यांची भूमिका ठामपणे मांडत होते. मात्र, त्यास काही व्यापार्‍यांकडून दुजारा मिळत होता. म्हणजे व्यापारी महासंघाचा शब्द अधोरेखित केला जात नाही का? असाही प्रश्र्न समोर येत आहे.

बारामतीत सतत वाहतुक अडथळा, पार्किंगची दुरावस्था इ.मुळे व्यापार्‍यांवर खापर फोडले जाते. मात्र, व्यापारी महासंघाने याबाबत नगरपरिषदेला हॉकर्स झोन, पार्किंगची सुविधा इ. पाठपुरावा करणे गरजेचे आहे. बारामती शहर पोलीस स्टेशनचे येणारे प्रत्येक पोलीस निरीक्षक पार्किंगचा प्रश्र्न सोडविला जाईल म्हणतात मात्र, बारामतीकरांना शिस्त लावून थकले तरीही पार्किंगचा प्रश्र्न सुटला नाही. सध्याच्या पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी चार चाकी वाहनांना व्यापार पेठेतून बंदी केलेली असताना, या व्यापार पेठेला जोडणार्‍या काही गल्ली बोळातून चारचाकी वाहने घालून वाहतुक कोंडी करणारे काही महाभाग आहेत. पोलीसांनी लावलेले फलक, बॅरेगेट सुद्धा या लोकांना कळेना.

संबंधीत व्यापारी व दुकानात काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या वाहने लागल्याने दुकानात येणार्‍या ग्राहकांना वाहने पार्क करता येत नाही असे म्हटले होते. त्यावर फक्त सोमाणी ग्रुप यांनी सिद्धेश्र्वर गल्ली याठिकाणी फक्त कर्मचारी व ग्राहकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र सोय केलेली दिसत आहे. विशेष त्याठिकाणी एक वॉचमन ठेवलेला आहे. सोमाणी ग्रुप सारखे कित्येक व्यापारी आहेत त्यांनी मात्र, त्यांच्या कर्मचार्‍यांच्या वाहनांची सुविधा करणे गरजेचे आहे. कित्येक दुकानांच्या बाहेर भलं मोठे दुकान लावून बसणारे आहेत त्यावर कोणीही काही बोलत नाही.

अशा विविध प्रश्र्नांमुळे बारामती व्यापारी महासंघाकडे बोट दाखविले जाते का? बारामती व्यापारी महासंघाला समांतर व्यापारी महासंघ उभा राहण्यापेक्षा तातडीने व्यापारी महासंघाने दुकानदारांसाठी निर्णय घेणे गरजेचे आहे. सर्वात जुना बारामती व्यापारी महासंघ आहे. त्यामुळे तो टिकला पाहिजे हे सर्वांना वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!