बारामती(वार्ताहर): तालुक्यातील धडाडीचे कार्यकर्ते ऍड.गोविंद देवकाते यांची भारतीय जनता पार्टीच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
विधानसभा विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पुण्याचे खासदार गिरीष बापट यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भोडगे यांच्या शुभहस्ते पुणे जिल्हा कार्यालयात नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले.
ऍड.देवकाते पक्षाच्या प्रत्येक घडामोडीत सक्रीय सहभाग दर्शवून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्र्नासाठी सतत कार्यरत असतात. यापुर्वी त्यांच्याकडे जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून जबाबदारी होती. गेल्या 20 वर्षापासुन सामाजिक व राजकीय कामात सहभाग आहे. ओबीसी आंदोलनात सहभागी होऊन ओबीसींचे प्रश्र्न मार्गी लागावे म्हणून सतत प्रयत्न केले. नुकतीच त्यांनी कायद्याची पदवी घेतलेली असून पुढील काळात पक्षाला या पदवीच्या माध्यमातून फायदा होणार आहे. त्यांच्या निवडीमुळे सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.