बारामती(वार्ताहर): सूक्ष्म नेतृत्वामुळे बारामती पॅटर्नच्या माध्यमातून प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बारामती नगरपरिषदेच्या अध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे यांनी बोलताना सांगितले.
बारामती एस.टी. महामंडळाचे सर्व कर्मचार्यांनी एकता दाखवित स्वप्नपूर्ती एकता ग्रुपच्या माध्यमातून एस.टी. स्टँडच्या समोर स्वादिष्ट चहा व नाष्ट्याची दर्जेदार सोय प्रवाशांना उपलब्ध करून दिलेली आहे. या दुकानाचे उद्घाटन प्रसंगी सौ.तावरे बोलत होत्या.

यावेळी गटनेते सचिन सातव, आगार प्रमुख श्री.गोंजारी, माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक बिरजू मांढरे, नवनाथ बल्लाळ, शिवसेनेचे ऍड.राजेंद्र काळे, मुस्लीम बँकेचे संचालक आलताफ सय्यद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष नितीन मोहिते, बा.न.प. शिक्षण मंडळाचे माजी सभापती कमरूद्दीन सय्यद, ऍड.भार्गव पाटसकर, माजी नगरसेवक विजय सोनवणे, अभिजीत सोनवणे, परवेज सय्यद, फिरोज अ.बागवान इ. मान्यवर उपस्थित होते.
पुढे सौ.तावरे म्हणाल्या की, बारामतीच्या बसस्थानकास अनन्य साधारण असे महत्व आहे. त्यामुळे अत्याधुनिक बसस्थानक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. लालपरीच्या माध्यमातून प्रवाशांना ज्याप्रमाणे दर्जेदार प्रवास सेवेप्रमाणे पुढील काळात कर्मचार्यांनी एकता दाखवीत स्वप्नपूर्ती ग्रुपच्या माध्यमातून लालपरी स्वादिष्ट चहा व नाष्ट्याची दर्जेदार सेवा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला कर्मचार्यांचा बचत गट आहे. या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन या महिला करीत आले आहे. कोरोनाचे संकट सर्वांवर आले आहे. एकमेकांना साथ देणे, समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा परिस्थितीत सुद्धा एस.टी.च्या सर्व कर्मचार्यांनी सेवा बजावली आहे. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व एस.टी.पुरूष व महिला कर्मचार्यांची मोलाचे सहकार्य केले.