अशोक घोडके यांजकडून…
गोतोंडी(वार्ताहर): राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतून इंदापूर तालुक्याला 1 लाख 40 हजार रु चे अनुदान मंजूर झाले असल्याची माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सागर(बाबा)मिसाळ व इंदापूर चे तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी दिली.
यावेळी राष्ट्रीय कुंटुंब लाभ योजनेचे जुलै 2021 ला 7 प्रकरणे या योजनेची संपुर्ण कागद पत्रासहित कार्यालयांत प्राप्त झाली होती 7 लाभार्थींना 20 हजार रु प्रमाणे चेक मंजूर करण्यांत आले आहे. 20 हजार रुपये प्रमाणे मंजूर झालेल्या लाभार्थ्यांमध्ये काजल रविंद्र साबळे (अंथुर्णे), कस्तुरा शहाजी चव्हाण (लासुर्णे), वैशाली अंकुश ढावरे(इंदापूर), अनुराधा रामचंद्र पवार (कळंब), कु.हर्षल हनुमंत कोकाटे (सराटी), द्रोपदा रामचंद्र जाधव(काटी), कांचन रोहिदास कांबळे (रुई), यांचा समावेश आहे.
इंदापूर तालुक्यांतील सन 2019,20,21 या वर्षाच्या कालावधीत व सन 2002 ते 2017 च्या द्ररिद्य रेषेखाली कुटूंबांतील प्रमुख व्यक्ती मयत झाले असल्यांस त्यांच्या कुटूंबातील सदस्यांनी सर्वकागदपत्रे घेऊन इंदापूर नायब तहसिलदार सो प्रियंका वायकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सागर (बाबा) मिसाळ यांनी केले आहे.