बारामती(वार्ताहर): राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त बारामती शहर व तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने उपजिल्हा रूग्णालय बारामती येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांचा कोरोना योद्धा पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले.
येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ.सदानंद काळे यांच्या समवेत रूग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांनी गेली दीड वर्ष अधिकारी व कर्मचारी यांनी कोरोना काळामध्ये केलेल्या उत्कृष्ठ कामाबद्दल कोरोना योद्धा पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष ऍड.सुभाष ढोले, दक्षता समितीचे अध्यक्ष ऍड. अविनाश गायकवाड, जिल्हा सरचिटणीस शब्बीर शेख, महिला तालुकाध्यक्षा सौ.वनिता बनकर, शहराध्यक्षा सौ.अनिता गायकवाड, युवती शहराध्यक्षा सौ.आरती शेंडगे, टी.व्ही.मोरे, इ. मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राष्ट्रवादी कॉंग्रेस बारामती शहर उपाध्यक्ष राहुल इंगुले यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रूग्णालयातील ज्येष्ठ अधिपरिचारीका श्रीमती जयश्री देवकाते वक्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी हनुमंत शिंदे यांचे सहकार्य लाभले. यावेळी 125 कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला.