बारामती(वार्ताहर): बारामती येथील महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस अपंग सेलचे उपाध्यक्ष संतोष पानाचंद टाटीया व पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस ज्येष्ठ नागरिक सेलचे उपाध्यक्ष बन्सीलाल झुंबरलाल मुथा यांच्या वतीने आणि रेसलिंग वॉरियर्स फेडरेशनच्या वतीने बारामती येथे ना.अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ पैलवानांचा रविवार दि.1ऑगस्ट रोजी सत्कार करण्यात आला.
पोपटराव (कारभारी) गावडे, बाळासाहेब देवकाते, विलास जाधव, सदाशिव मोरे, शाहाजी काळे, एकनाथ पलंगे, पांडुरंग भोसले, गायकवाड सर, चांदगुडे वस्ताद, किसन जाधव, संजय(बापू) जगदाळे, दशरथ निकम, गणपत तावरे किशोर देवळे, विजय जगताप, आबा गावडे, किशोर देवळे, भारत ढोले, महादेव गावडे, शिवा गावडे चंद्रकात चव्हाण, राजेंद्र गावडे, जनार्दन चैधर, बाळासाहेब बुलबुले या पैलवांनांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बारामती शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर हे होते. या प्रसंगी दै.पुढारी पत्रकार श्री. मोरे यांचा ही सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून बारामती बँकेचे संचालक उद्धव गावडे, सुभाष जांभळकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस शहर सरचिटणीस शब्बीर शेख, पै.सुधाकर माने हे होते.
याकार्यक्रमाचे संयोजन संतोष टाटीया व बन्सीलाल मुथा, सागर माने, गणेश जाधव, धनंजय गावडे यांनी केले.