वतन की लकीर (ऑनलाईन): भारतात आढळलेला डेल्टा विषाणू हा मानवांमध्ये गंभीर आजार निर्माण करत असल्याचा धक्कादायक अहवाल अमेरिकेच्या वैद्यकीय अधिकार्यांनी सादर केला आहे. कांजण्यांच्या विषाणूप्रमाणे डेल्टाचा संसर्ग पसरत असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.
डेल्टा विषाणू हा मर्स, सार्स, इबोला, सर्दीचा विषाणू, मोसमी फ्लू अशा विषाणूंइतकात वेगानं पसरतो. हा विषाणू कांजण्यांच्या विषाणू इतकाच संसर्गजन्य असल्याचं म्हटले आहे.
बारामतीत दि.30 जुलै 2021 रोजी दिवसभरात बारामती शहरातून 13 तर ग्रामीण भागातून 28 रुग्ण असे मिळून 41 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.
काल बारामतीत 331 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 01 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकही रुग्ण प्रतिक्षेत नाही. इतर तालुक्यात सुद्धा एकही रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही.
काल खाजगी प्रयोगशाळेत 64 रूग्णांची आरटी-पीसीआर तपासणी केली असता 12 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 1220 रुग्णांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 28 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला आहे. म्युकर मायकॉसिसचे एकुण 39 रूग्णांपैकी बारामती तालुक्यातील 31 तर इतर तालुक्यातील 08 रूग्ण आहेत. यापैकी उपचार घेणारे 02 रूग्ण आहेत.
काल दिवसभरात बारामतीत एकूण 41 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बारामतीत 26 हजार 891 रुग्ण असून, बरे झालेले 25 हजार 904 आहे. आज डिस्चार्ज 65 असुन, आतापर्यंत मृत्यू झालेले 683 असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी कळविले आहे.