बारामती(उमाका): उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा क्षेत्राचा विकास होणार असल्याचे प्रतिपादन एकात्मिक विकास समन्वय व पुनर्वलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी केले.
बारामती तालुका क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त बारामती जिल्हा क्रीडा संकुल व बारामती तालुक्यातील क्रीडाक्षेत्रात वेगवेगळ्या खेळांचे मार्गदर्शन करणार्या क्रीडा शिक्षकांचा सन्मान कार्यक्रमप्रसंगी श्री.होळकर बोलत होते.
यावेळी जिल्हा क्रीडा संकुल समिती सदस्य अविनाश लगड, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षक महासंघ पुणेचे अध्यक्ष शरदचंद्रजी धारूरकर, उपाध्यक्ष मिलिंद क्षीरसागर, बारामती बिल्डर्स असोसिएशन दीपक काटे, बारामती लॉन टेनिस असोसिएशनचे सचिव दत्तात्रय बोराडे, श्री.सोडमिसे, बारामती तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्री.पंचनदिकर, उपाध्यक्ष संजय संघवी वाहतूक निरीक्षक विनायक साखरे, तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे इ. मान्यवर उपस्थित होते.
पुढे होळकर म्हणाले की, क्रीडा क्षेत्राला नेहमीच सहकार्य राहील अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली नवनवीन क्रीडांगणे व क्रीडा सुविधा उपलब्ध होतील. वेगवेगळ्या शाळेतील उपस्थित शिक्षक व प्रशिक्षकांशी संवाद साधुन त्यांनी क्रीडा क्षेत्राचा आढावा घेतला.
यावेळी मिलिंद क्षिरसागर यांनी गुरूपौर्णिमेचे महत्त्व तर बारामतीतील क्रीडा क्षेत्रातील यशस्वी घोडदौड याविषयी शरदचंद्रजी धारूरकर यांनी गौरवोद्गार काढले.
यावेळी कबड्डी क्षेत्रातील दादासो आव्हाड, मोहन कचरे, दत्तात्रय चव्हाण, व्हॉलीबॉल शिवाजी जाधव, बॉक्सिंगमध्ये अमर भांडलकर, हिम्मत कौले, लॉनटेनिस- प्रदीप कुंचुर, दत्तात्रय बोराडे, कराटे-रविंद्र करळे, अभिमन्यु इंगोले, योगा – श्री.महाजन, बॅडमिंटन- गणेश सपकाळ, तनुजा सपकाळ, जिम ट्रेनर-अनिल जगताप, विद्या प्रबोधिनी करइर ऍकॅडमीचे श्री.घाडगे, सोमेश्वर विद्यालय मुर्टीचे प्रा.संजय होळकर, विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाचे प्रा.लक्ष्मण मिटकरी, टी.सी. कॉलेजचे प्रा.अशोक देवकर, अनिल गावडे, म.ए.सो. विद्यालयाचे दादासाहेब शिंदे, जनहित प्रतिष्ठानचे माध्यमिक विद्यालयाचे सचिन नाळे, जेडी गावडे विद्यालय पारवडीचे दीपक नलावडे, विद्या प्रतिष्ठानचे न्यू बालविकास मंदिर पिंपळीचे प्रसाद रणवरे, मेखळी हायस्कूलचे सुभाष चव्हाण, तु.च.इंग्लिश मेडीयम स्कूलचे बास्केटबॉल शिक्षक अभी चव्हाण इ. शिक्षक व प्रशिक्षकांचा सन्मान उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले होते. सुत्रसंचलन प्रा.अशोक देवकर यांनी केले. शेवटी आभार राजेंद्र खोमणे यांनी मानले. सर्व कार्यक्रमासाठी गुलाबपुष्प दत्तात्रय बोराडे यांच्या सौजन्याने देण्यात आली होती.