कोरोनाची तिसरी लाट आलीच, डब्ल्यूएचओने केली घोषणा: बारामतीत 65 कोरोना बाधीत

वतन की लकीर (ऑनलाईन): कोरोनाची तिसरी लाट आल्याची घोषणा डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ.टेड्रोस गेब्रेयेसस यांनी केली आहे. कोरोनाचा दुसरा टप्पा संपून तिसर्‍या लाटेच्या पहिल्या टप्प्यात आलो आहोत. हा विषाणू स्वत:मध्ये सतत बदल करून अधिक संसर्गजन्यही होत आहे. डेल्टा 111 देशांमध्ये पोहोचला असून अल्फा 178 देशात तर बिटा 123 आणि गामा 75 देशांमध्ये दिसून आला आहे.

नागरीकांमध्ये दुसरी लाट ओसरल्यानंतर जी बेफिकीरी दिसत आहे ती चिंताजनक असून तिसर्‍या लाटेचे गांभिर्य वाढवणारी असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी म्हटले आहे.

बारामतीत दि.16 जुलै 2021 रोजी दिवसभरात बारामती शहरातून 15 तर ग्रामीण भागातून 50 रुग्ण असे मिळून 65 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.

काल बारामतीत 252 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 04 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकही रुग्ण प्रतिक्षेत व इतर तालुक्यात नाही.

काल खाजगी प्रयोगशाळेत 33 रूग्णांची आरटी-पीसीआर तपासणी केली असता 07 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 528 रुग्णांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 54 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला आहे. म्युकर मायकॉसिसचे एकुण 39 रूग्णांपैकी बारामती तालुक्यातील 31 तर इतर तालुक्यातील 08 रूग्ण आहेत. यापैकी उपचार घेणारे 04 रूग्ण आहेत.

काल दिवसभरात बारामतीत एकूण 65 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बारामतीत 26 हजार 256 रुग्ण असून, बरे झालेले 25 हजार 211 आहे. आज डिस्चार्ज 24 असुन, आतापर्यंत मृत्यू झालेले 672 असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी कळविले आहे.

बारामतीत वाढत्या रूग्ण संख्येमुळे रविवार दि.18 जुलै 2021 पासून वीकएंड लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय व्यापारी महासंघाने घेतलेला आहे. या वीकएंड मध्ये शनिवार-रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व पूर्णपणे कडकडीत बंद राहणार असल्याचे बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!