बारामती(वार्ताहर): कोणत्याही माणसाच्या अंगातील रक्त हे जात,धर्म, वंश सांगत नाही. संकटकाळी हेच रक्त एकमेकांची मदत करत असते व रक्ताची नाती कधीच तुटत नसतात असे म्हटले जाते त्याचप्रमाणे बारामतीचे माजी नगरसेवक अभिजीत भिमराव काळे यांनी चक्क स्वत:च्या रक्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

बारामतीच्या लोकप्रिय खासदार सुप्रिया सुळेंनी 450 अनाथ मुलांशी संवाद साधुन एक प्रकारे अनोख्या शुभेच्छा दिल्या. कोणी रक्तदान करून तर कोणी अन्नदान, आरोग्य शिबीर राबवून तर कोणी सायकलींग, रनिंग करून अजितदादांना भरभरून शुभेच्छा दिल्या. अभिजीत काळे यांनी चक्क स्वत:च्या रक्ताने हस्ताक्षरात पत्र लिहून शुभेच्छा दिल्या त्यांनी पत्रात म्हटले की, महाराष्ट्राच्या जनतेच्या ईच्छा आकांक्षा तुमच्याकडून पूर्ण होऊ दे…! मनात आमच्या एकच ईच्छा आमचे दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ दे…!! अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिजीत काळे हे माजी उपनगराध्यक्ष कै.भिमराव काळे यांचे सुपूत्र आहेत. अजितदादा युवाशक्ती या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. या संस्थेच्या माध्यमातून विविध ठिकाणी समाजोउपयोगी कार्यक्रम राबवित असतात. पवार कुटुंबियांवर काळे कुटुंबियांची असणारी एकनिष्ठता, प्रेम, विश्र्वास यामधून समोर आले आहे.