बारामती(वार्ताहर): इसमाची टेहाळणी करून रक्कम जबरदस्तीने हिसकावून जबरी चोरी करणार्या तीन आरोपींना बारामती शहर गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, इंदापूर रोड लगत शिवरत्न पेट्रोलपंप जवळ स्पेशल चाय या चहाचे टपरी जवळ तीन अज्ञात चोरटयांनी एका इसमास जबर मारहाण करून त्याचे पॅन्टचे खिशातील 18 हजार 500 रूपये जबरदस्तीने हिसकावुन घेवुन जबरी चोरी करून पळुन गेले बाबत बारामती शहर पोलीस स्टेशनला दि.30 जून 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपासाकामी गुन्हयातील गेलेल्या मालाचा व अज्ञात आरोपींचा शोध बारामती शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने चालू केला.
सि.सि.टी.व्ही फुटेज तसेच गुप्त माहितीदार यांचे मार्फत यातील आरोपी नामे पिण्या उर्फ अमर सुनिल सोनवणे (रा.आमराई बारामती ता.बारामती जि.पुणे.) अशुतोष सुरेश भिसे (रा.सुहासनगर आमराई बारामती जि.पुणे) कृष्णा सुर्यकांत कुमार (रा.सुहासनगर आमराई बारामती जि.पुणे) यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस चौकशी केली असता यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबूली दिली. तपासा दरम्यान 3 हजार रूपये रोख रक्कम असा मुददेमाल हस्तगत करून गुन्हयाचे पुरावे कामी जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, महिला साहायक पोलीस निरीक्षक अश्वीनी शेंडगे, सहायक फौजदार शिवाजी निकम, पोलीस नाईक रूपेश साळुके, सागर देशमाने, पो.कॉ. सुहास लाटणे, दशरथ इंगोले, अजित राऊत, तुषार चव्हाण, अकबर शेख यांनी केली.