कुरेशी युथ जमातीच्या पश्र्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी सुब्हान कुरेशी

बारामती(वार्ताहर): गेल्या 15 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करीत आलेले सुब्हान बाबाभाई कुरेशी यांची नुकतीच ऑल इंडिया जमियतुल कुरेश युथ विंगच्या पश्र्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

कुरेशी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या माध्यमातून सामाजिक कामाची मुहूर्तमेढ रोवली होती. एकता महिला पतसंस्था, एकता इंग्लिश मिडीयम स्कूल स्थापनेमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे.

समाजातील गोर-गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी त्यांनी मौलाना आझाद विकास महामंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले आहे. समाजातील युवकांना योग्य दिशा व रोजगार मार्गदर्शन केले. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला. शालेय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना जातीचे दाखले मोफत वाटप केले. हज यात्रा करू इच्छिणार्‍या बारामती तालुक्यातील ज्येष्ठांना शासकीय फीमध्ये पासपोर्ट काढून देण्यामध्ये त्यांचे खूप मोठे योगदान आहे. महिलांचे सबलीकरण व्हावे म्हणून बचत गट स्थापन करून महिलांना रोजगार व आर्थिक बचतीबाबत पुढाकार घेतला. लघु व्यवसाय धारकांना व्यवसाय वाढीसाठी मौलाना आझाद विकास महामंडळातर्फे व्यावसायिक कर्ज उपलब्ध करून दिले. युवकांना आरोग्याबाबत जनजागृती व्हावी म्हणून युनिटी हेल्थ क्लबची स्थापना केली. कुरेशी समाजातील युवक एकत्र करून त्यांनी अल कुरेश सामाजिक संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून बिफ मार्केट, कुरेशी मोहल्ला येथे वृक्षारोपण, कुरेशी दफनभूमी विकसित केली. कुरेशी बांधवांमध्ये शिक्षणाची जनजागृती व्हावी म्हणून घरोघरी जावून शैक्षणिक उपक्रम राबविले. या सर्व बाबींची दखल घेत ऑल इंडिया जमियतुल कुरेश संघटनेने त्यांना युथ विंगच्या पश्र्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे. त्यांच्या निवडीबाबत सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

युथ विंगच्या माध्यमातून व राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान कुरेशी व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबुसूफियान कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पश्र्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यात युवकांची फळी निर्माण करून त्यांच्यामध्ये सामाजिक व शैक्षणिक जनजागृती करणार – सुब्हान कुरेशी, अध्यक्ष पश्र्चिम महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!