महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची वैयक्तिक कर्ज योजनेबाबतच्या अधिक माहितीसाठी ओ.बी.सी. महामंडळाच्या जिल्हा कार्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,इमारत क्र.बी,सनं.104/105, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, विश्रांतवाडी, येरवडा, पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन पुणे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक धर्मेंद्र काकडे यांनी केले आहे.
म.रा.इ.मा.वि. वि. महामंडळाच्या सन 2021-22 या वर्षाकरिता वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत पुणे जिल्ह्यासाठी 83 भौतीक व आर्थिक 94.62 लाख तसेच गट कर्ज व्याज परतावा योजनेसाठी भौतीक 15 व आर्थिक 85.50 लाख उदिष्टये प्राप्त झाले आहे.
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर समकक्ष रु. 10 लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज परतावा तसेच रु.10 ते 50 लाखापर्यंत समकक्ष गटकर्ज व्याज परतावा योजना आहे. या दोन्ही योजना बँकेमार्फत राबविली जाईल, कर्ज रकमेवरील व्याज परतावा हा बँक प्रामाणिकरणानुसार (जास्तीत जास्त 12% पर्यंत) महामंडळाकडून केला जाईल. वैयक्तिक गट परतावा योजनेसाठी लाभार्थीची (इतर मागासवर्गीय) कौटूंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.8 लाख आहे. तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा, वय 18 ते 50 पर्यंत कर्ज खाते आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य राहील, महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य, उमेदवाराने अर्ज करतेवेळी यापूर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा, बँकेचा/वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा, कुटुंबातील एका व्यक्तीला एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.
लाभार्थीने मध्येच कर्ज परतफेड नाही केली तर व्याज परतावा दिला जाणार नाही. गट कर्ज व्याज परतावा योजनेसाठी शासन मान्य बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी कायदा 2013) च्या वेबपोर्टलनुसार अर्ज करू शकतात. गटातील उमेदवाराने अर्ज करतेवेळी या प्रकरणासाठी व यापूर्वी महामंडळाच्या व इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेतलेला नसावा, गटाने कर्ज प्रकरण हे सार्वजनिक वित्तीय प्रणालीद्वारे प्रकरण हाताळण्यास सक्षम असलेल्या बँकेत केलेले असावे. गटाच्या भागीदाराचे किमान रु.500 कोटीच्या ठेवी असलेल्या व कोअर बँकिंग सिस्टीम असलेल्या राष्ट्रीयकृत/शेड्युल बँकेत खाते असावे. गटातील सर्व सदस्यांच्या क्रेडीट स्कोर किमान 500 असावा.
अधिक माहितीसाठी ओ.बी.सी. महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा. जिल्हा कार्यालयाचा पत्ता व फोन नंबर पुढीलप्रमाणे पत्ता-डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारत क्र बी. स नं 104/105, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, विश्रांतवाडी, येरवडा, पुणे- 411006
फोन: 020-29523059, वेबसाईट-www.msobcfdc.org हा आहे.