बारामती(उमाका): महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री , हरीतक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त प्रशासनाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस तहसिलदार विजय पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास निवासी नायब तहसिलदार धनंजय जाधव, निवडणूक नायब तहसिलदार पी.डी. शिंदे तसेच तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.