बारामती(वार्ताहर): सी.आर. सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 200 हुन अधिक मंगल परिणय लग्न विवाह लावणारे भारतीय बौद्ध महासभा मावळ तालुका अध्यक्ष निमंत्रक पुणे जिल्हा व संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बौद्धचार्य अमर चौरे यांना कोरोना युद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले.
सी.आर.सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ऍड हेमचंद्र मोरे यांच्या उपस्थितीत चौरेचा सत्कार करण्यात आला. चौरे यांनी आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता लोकडाऊन मध्ये खूप मेहनतीने समाजकार्य केले त्यांना सन्मान पत्र व झाड देऊन गौरविण्यात आले. यावेळी संघटनेचे राज्य युवक अध्यक्ष रोशन शिंदे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन आप्पा चव्हाण इ उपस्थित होते.