बारामती(वार्ताहर): अनंतशांती बहुउद्देशिय सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर व कसबा वाळवे महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत बारामती येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्या सौ.कल्पना जाधव (काटकर) यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेबद्दल राजमाता जिजाऊ रत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. राजमाता जिजाऊ पुण्यतिथी निमित्तांने सपुर्ण महाराष्ट्रात विविध श्रेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या कत्वुत्वान महिलांना राजमाता जिजाऊ रत्न पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.