एका वकिलाने केली चालू सेवेत महिला कर्मचार्याशी अश्लील चाळे : गुन्हा दाखल होणार का?
बारामती(प्रतिनिधी): येथील एका लिंगपिसाट वकीलाने चालू सेवेत बारामती न्यायालयातील महिला कर्मचार्याशी अश्लील चाळे केल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. सदरची महिला हिंसेची बळी ठरली असून संबंधित लिंगपिसाट वकिलावर कामाच्या ठिकाणी महिलांचे लैगिक शोषण प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल होणार का? अशी केविलवाणी हाक सर्वसामान्य जनतेकडून दिली जात आहे.
बारामती येथील अतिरीक्त सत्र न्यायालयाच्या आसपास या वकिलाचे कार्यालय आहे. सदरचा वकील लिंगपिसाट आहे. यापुर्वी सुद्धा लिंगपिसाट असल्याचे दर्शन घडले होते. सदरचा वकिल कित्येक दिवसापासून न्यायालयातील महिला कर्मचार्यावर नजर ठेवून होता. या महिलेशी जवळीक साधण्याचा सतत प्रयत्न करत होता. मात्र, सदरची महिला या वकिलास भीक घालत नव्हती. तरी सुद्धा या वकिलाने एकांतात गाठून सदर महिलेशी अश्लील चाळे केले. या महिलेने सदरचा प्रकार महिला न्यायाधिश व पुरूष न्यायाधिशांना सांगितला. या न्यायाधिशांनी सकारात्मक पाठिंबा दर्शविला मात्र, पुढे काहीच झाले नाही असे दिसत आहे.
भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत हक्क आणि अधिकार हा स्त्रीयांच्या विकासाचा पाया आहे. महिलांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन प्रामुख्याने कल्याणकारी असणे गरजेचे आहे. राज्यशासनाने महिला धोरण आखले आहे. महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे, समान संधी मिळाली पाहिजे व त्यांच्यासाठी केलेल्या कायदेशीर तरतूदींची आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी सुद्धा झाली पाहिजे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेत महिलांबाबत भेदभाव दूर करणे व न्याय व्यवस्थेत समानतेचे तत्व समाविष्ठ करणेबाबत ठराव संमत केला. मात्र त्याची अंमलबजावणी कागदावरच राहिलेली दिसत आहे.
आज ज्याठिकाणी सर्व घटकातील व्यक्ती झालेल्या अन्यायाच्या विरोधात न्याय मागण्यासाठी न्यायालयात येतो त्याचठिकाणी लिंगपिसाट वकिलाने तेही न्यायालयात काम करणार्या महिला कर्मचार्याशी अश्लील चाळे केले त्यावर कुठेही वाच्यता नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे.
न्यायालयात भ्रमणध्वनी वाजला तर कारवाई होते. धुम्रपान केल्यास कारवाई होते. मग आज न्यायालयातील महिला कर्मचारी लिंगपिसाट वकिलाच्या हिंसेची बळी ठरत असेल तर या महिलेने कोणाकडे दाद मागायची हा खरा प्रश्र्न आहे. त्यामुळे संबंधित लिंगपिसाट वकिलावर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे अन्यथा सर्वसामान्य नागरीकांचा न्याय व्यवस्थेवरील विश्र्वास संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही.
आज श्री छत्रपती शिवाजी महाराज असते तर….
विनोद करीत नाही..आज श्री छत्रपती शिवाजी महाराज असते तर या वकिलाचा चौरंग केला असता. ज्याप्रमाणे महाराजांनी महिलांवर अन्याय, अत्याचार व स्वराज्य विघातक कारवाया करणार्यांचा चौरंग केला होता. यामध्ये रांझ्याचा व जावळी खोर्यात काय झाले याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.