बारामती(मा.का.):महाराष्ट्र राज्याचा शेतीचा खरीप हंगाम हा अत्यंत महत्त्वाचा हंगाम आहे. रासायनिक खते ही शेतीची महत्त्वाची निविष्ठा आहे. शेतकर्यांची खते खरेदीसाठी लगबग सुरू आहे.
राज्यामध्ये खालील प्रमाणे खत प्रकार निहाय खत साठा आज रोजी उपलब्ध आहे. 1) युरिया -4,18,410 मे. टन. 2) डीएपी.-1,00,230 मे. टन. 3) एमओपी – 1,45,130 मे. टन. 4) संयुक्त खते -7,34,790 मे.टन. 5) एसएसपी – 4,22,170 मे. टन.
राज्यात सर्व रासायनिक खते मिळूण एकत्रित 18,20,730 मे.टन. इतका खत साठा असून जुन महिन्यात खतांची कोणतीही टंचाई भासणार नाही. केंद्र सरकार कडून प्रत्येक महिन्यात राज्याला पुरेसा खत साठा मंजूर होत असल्याने शेतक-यांनी खत उपलब्धतेची चिंता करु नये अथवा विनाकारण खताची साठेबाजी करु नये. प्रत्येक जिल्ह्यात बियाणे, खते उपलब्धतेच्या अडचणी मांडणेसाठी मोबाईल फोन क्रमांक दिले असून राज्यस्तरावर 8446117500, 8446331750, 8446221750 आणि 18002334000 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन दिला आहे.
शेतकर्यांनी विविध अडचणीबाबत कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन श्री. धीरज कुमार, कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.