बारामती(वार्ताहर): लोकगीतांची उज्ज्वल परंपरा राधा खुडे आपल्या मधुर व पहाडी आवाजाच्या माध्यमातून जोपासत आहेत याचा अभिमान असल्याचे प्रतिपादनन बारामती नगर परिषदेचे बांधकाम सभापती सत्यव्रत काळे यांनी केले.
कलर्स मराठी दूरचित्र वाहिनीच्या माध्यमातून ’सूर नवा ध्यास नवा.. आशा उद्याची..’ या स्पर्धात्मक कार्यक्रमामध्ये इंदापूर तालुक्यामधील वालचंदनगर येथील कु.राधा दत्तात्रय खुडे हिने आपल्या मधुर व पहाडी आवाजाने वेगवेगळी गीतांचे धडाकेबाज गायन करून परीक्षकांसह उभ्या महाराष्ट्रातील रसिकांची मने जिंकून स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावून मानाचा पुरस्कार प्राप्त केला. तिच्या यशाबद्दल बारामती नगरपरिषदेचे बांधकाम सभापती सत्यव्रत काळे व खबर सबसे तेज या सामाजिक ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी खबर सबसे तेज अध्यक्ष हनुमंत केंगार, अमोल रजपूत, संतोष कदम, प्रेमकुमार धर्माधिकारी, दत्तात्रय खुडे, शीला खुडे, रोहन माघाडे, किशोर पवार, सुमित मोहिते, संजय खाडे, सूरज झनझाने, रमेश गायकवाड, सिद्धार्थ भोसले, युवराज रजपूत, प्रतीक झेंडे यांची उपस्थिती होती.