सर्व कर भरूनही मुलभूत गरजांपासून नागरीक वंचित

बारामती(वार्ताहर): येथील बारामती औद्योगिक विकास महामंडळाच्या पीएपी डी ब्लॉक या व्यावसायिक भागात नागरीक सर्व कर भरीत असताना सुद्धा त्यांना मुलभूत गरजांपासून वंचित रहावे लागत असल्याने येथील नागरीक त्रस्त झालेले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांना याबाबत निवेदन देणार असल्याचे कळते.

ना.अजित पवार यांनी ज्याप्रमाणे चोहुबाजुने विकास केलेला असताना महामंडळातर्फे व्यावसायिक भागात रस्ते नाही, ड्रेनेज लाईन नाही. वेळोवेळी लेखी व तोंडी मागणी करूनही महामंडळ जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे येथील नागरीकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले आहे. याबाबत महामंडळाने तातडीने ठोस निर्णय न घेतल्यास राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांना महामंडळाच्या कारभाराबाबत येथील नागरीक निवेदन देवून भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. या मुलभूत गरजा नसल्याने विकासात्मक शहरात आपण आहोत का? असा प्रश्र्न निर्माण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!