ऍड.अविनाश गायकवाड यांची शासकीय दक्षता समीती बारामतीचे अध्यक्षपदी नियुक्ती

बारामती(वार्ताहर)ः बारामती येथील ऍड.अविनाश वामनराव गायकवाड यांची शासकीय दक्षता समीती बारामतीचे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी याबाबत समिती गठीत करुन आदेश पारीत केले आहेत.

आजपावेतो या पदावर आमदार म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार हे पदसिध्द अध्यक्ष होते. मात्र प्रथमत:च या पदावर अजित पवार यांनी स्वतः नामनिर्देशीत करुन ऍड.अविनाश गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समीती पुढे दिल्याप्रमाणे गठीत करण्यात आली आहे.

अध्यक्ष ऍड.अविनाश वामनराव गायकवाड, पदसिध्द सदस्य सचिव तहसिलदार बारामती आणि सदस्यपदी पदसिध्द सदस्य बा.न.पा. नगराध्यक्ष, महिला सदस्या म्हणून श्रीमती रहेना महबूब शिकीलकर, श्रीमती रेश्मा संजय ढोबळे, अनुसूचित जाती प्रतिनिधी सुशांत दत्तात्रय सोनवणे, अनुसूचित जमाती प्रतिनिधी सचिन उत्तम माने, शिधावाटप दुकानदार प्रतिनिधी मधुकर रामचंद्र नागवडे, ग्राहक चळवळ प्रतिनिधी विरधवल गिरीश गाडे, अल्पसंख्यांक प्रतिनिधी शौकत बशीर बागवान, सामाजिक कार्यकर्ता प्रतीनिधी बाळासाहेब दत्तात्रय चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती वेळी बोलताना गायकवाड म्हणाले की, पुढील काळात दक्षता समीतीचे माध्यमातून सार्वजनीक वितरण व्यवस्थेमध्ये वेळोवेळी येणारे अडचणींवर जातीने लक्ष ठेऊन त्वरीत मार्ग काढू तसेच प्रशासन व समीतीचे माध्यमातून योग्य नियंत्रण ठेवणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!