बारामती(वार्ताहर): बारामती नगरपरिषदेचे राजेंद्र सोनवणे यांची महाराष्ट्र शासनाच्या संवर्गात समावेश होऊन आरोग्य निरीक्षकपदी निवड झालेबद्दल प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रहार दिव्यांग संघटना बारामती तालुका व शहर यांच्या वतीने सोनवणेंचा सत्कार व अभिनंदन नगरपरिषद त्यांच्या दालनात करण्यात आला व त्यांच्या पुढील वाटचालीस प्रशासकीय कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे कैलास(भाऊ) शिंदे, प्रशांत गायकवाड, यांच्यासह अजिज शेख, फरीद शेख, सुरज गायकवाड, निनाद सोनवणे, बाळू रजपूत इ. उपस्थित राहुन सत्कार केला.