बारामती(वार्ताहर): मराठा सेवा संघ प्रणित, जिजाऊ ब्रिगेड बारामती तालुका यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्यभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या दिनाचे औचित्य साधुन मौजे मळद (भैय्यावस्ती) या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी वड, पिंपळ,कडुलिंब इ. पर्यावरण पूरक वृक्ष लावण्यात आले व वृक्षसंवर्धनाची ही जबाबदारी घेण्यात आली.
या कार्यक्रमास मळद ग्रामपंचायतीचे सरपंच योगेश बनसोडे, उपसरपंच किरण गावडे, मराठा सेवा संघ मा. जिल्हाध्यक्ष दीपक भराटे, मराठा सेवा संघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत तावरे, बारामती तालुका अध्यक्ष गोविंद वाघ, शहराध्यक्ष विकास खोत, जिजाऊ ब्रिगेड बारामती तालुका अध्यक्ष प्रा.सुषमा जाधव, उपाध्यक्ष शारदा मदने, सचिव शिलाराणी रंधवे, कार्याध्यक्ष विद्याराणी चव्हाण, तालुका संघटक स्मिता देवकाते, पोलीस मित्र संघटना बारामती अध्यक्ष सुरज तावरे, प्रीतम गुळूमकर, बारामती तालुका सम्यक विद्यार्थी संघटना अध्यक्ष रोहित भोसले, संचित मदने, इरीना यादव, रशिया प्रेम यादव इ. मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले व शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
तरी राज्य सरकारने या त्रस्त झालेल्या रिक्षा चालकांच्या इन्शुरन्स विषयी विचार विनिमय करून मार्ग काढावा अशी विनंतीही सोनवणे आणि शिंदे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.