कोरोनामुक्त झालेल्यांना शारीरिक व मानसिक अनारोग्याच्या तक्रारीत वाढ : बारामतीत 49 कोरोना बाधीत

वतन की लकीर (ऑनलाईन): बारामतीत दि.03 जून 2021 रोजी दिवसभरात बारामती शहरातून 14 तर ग्रामीण भागातून 35 रुग्ण असे मिळून 49 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत. पुणे जिल्ह्यात बरे होणार्‍या रुग्णांचे प्रमाण 96.04 टक्के आहे.

कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांमध्ये शारीरिक व मानसिक अनारोग्याच्या तक्रारीत वाढ होत आहे. त्यामध्ये दीर्घकाळ सर्दी, अंगदुखी, थकवा, केसगळतीचा त्रास, श्र्वास घेताना त्रास, अस्वस्थता येण्याची लक्षणे दिसून येत आहेत. उपचारादरम्यान स्टिरॉइडमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 17 हजार 164 रुग्णांपैकी 9 लाख 76 हजार 835 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. एक्टीव रुग्ण 23 हजार 437 आहे. कोरोनाबाधित एकूण 16 हजार 892 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.66 टक्के इतके आहे.

काल बारामतीत 305 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 28 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकही रुग्ण प्रतिक्षेत नसून, इतर तालुक्यात 06 रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. 150 रुग्णांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 16 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला आहे.

काल दिवसभरात बारामतीत एकूण 49 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बारामतीत 24 हजार 549 रुग्ण असून, बरे झालेले 23 हजार 028 आहे. डिस्चार्ज 96 असुन, आतापर्यंत मृत्यू झालेले 625 असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी कळविले आहे.

काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत आरटी-पीसीआर 43 जणांचे नमुने घेण्यात आले त्यापैकी 05 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत. म्युकर मायकॉसिसचे एकुण 21 रूग्णांपैकी बारामती तालुक्यातील 14 तर इतर तालुक्यातील 07 रूग्ण आहेत. यापैकी उपचार घेणारे 07 रूग्ण आहेत.

ज्या नागरिकांचे दुसरा डोस (कोवीशिल्ड) प्रलंबित आहे व पहिला डोस झाल्यानंतर 84 दिवस पूर्ण झालेले आहेत व ज्या नागरिकांचा (कोव्हॅक्सिन)या लसीचा दुसरा डोस (28 दिवस पूर्ण) प्रलंबित आहे अशाच नागरिकांसाठी महिला हॉस्पिटल बारामती व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणी लसीकरण सुरू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!