गायिका ’वैशाली माडेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

वतन की लकीर (ऑनलाईन): महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका व शेतकरी कुटुंबातील वैशाली माडे यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. यावेळी बारामतीच्या लोकप्रिय खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

जयंत पाटील यांच्या निर्देशांनुसार माडे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या विदर्भ विभाग अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाने माडे हिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या.

यापूर्वी देखील अनेक मराठी कलाकारांनी आपल्या हाती राष्ट्रवादीचा झेंडा घेतला आहे. हिंदी, मराठी चित्रपटांसह तिने अनेक मराठी मालिकांची ’टायटल सॉंग’ देखील गायली आहेत. ’भारतरत्न’ लता मंगेशकर व आशा भोसले यांची ती जबरदस्त फॅन आहे. मराठी बिग बॉसमुळे वैशाली माडे चर्चेत आली होती.

’बाजीराव मस्तानी’ या हिंदी चित्रपटातील ’पिंगा’ हे तिनं गायलेलं गाणं प्रचंड गाजलं. या गाण्यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. अलीकडेच तिनं ’कलंक’ चित्रपटातील ’घर मोरे परदेसिया..’ हे गाणं गायलंय आहे. महाराष्ट्रासह देशभरात वैशालीचे असंख्य फॅन्स्‌ आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!