वतन की लकीर (ऑनलाईन): बारामतीत दि. 28 मे 2021 रोजी दिवसभरात बारामती शहरातून 43 तर ग्रामीण भागातून 71 रुग्ण असे मिळून 114 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत. कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात भारताने अमेरिकेला केलेली मदत अमेरिका नेहमी स्मरणात ठेवील व अशा कठीण काळात आम्ही भारतासोबत उभे आहोत असे जो बिडेन प्रशासन व अँटनी ब्लिंकेन यांनी म्हटले आहे. राज्यात रिकव्हरी रेट 93.24 टक्क्यांवर आला असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
काल बारामतीत 486 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 85 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकही रुग्ण प्रतिक्षेत नसून, इतर तालुक्यात 06 रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. 173 रुग्णांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 14 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला आहे.
काल दिवसभरात बारामतीत एकूण 114 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बारामतीत 24 हजार 153 रुग्ण असून, बरे झालेले 22 हजार 093 आहे. डिस्चार्ज 176 असुन, आतापर्यंत मृत्यू झालेले 609 असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी कळविले आहे.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत आरटी-पीसीआर 92 जणांचे नमुने घेण्यात आले त्यापैकी 15 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत. म्युकर मायकॉसिसचे एकुण 21 रूग्णांपैकी बारामती तालुक्यातील 14 तर इतर तालुक्यातील 07 रूग्ण आहेत.
ज्या नागरिकांचे दुसरा डोस प्रलंबित आहे व पहिला डोस झाल्यानंतर 84 दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच नागरिकांसाठी महिला हॉस्पिटल बारामती व प्राथमिक आरोग्य केंद्र सांगवी या ठिकाणी लसीकरण सुरू आहे.