वतन की लकीर (ऑनलाईन): बारामतीत दि. 28 मे 2021 रोजी दिवसभरात बारामती शहरातून 35 तर ग्रामीण भागातून 64 रुग्ण असे मिळून 99 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.
काल बारामतीत 415 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 65 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकही रुग्ण प्रतिक्षेत नसून, इतर तालुक्यात 04 रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. 68 रुग्णांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 19 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला आहे.
काल दिवसभरात बारामतीत एकूण 99 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बारामतीत 24 हजार 031 रुग्ण असून, बरे झालेले 21 हजार 917 आहे. डिस्चार्ज 146 असुन, आतापर्यंत मृत्यू झालेले 606 असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी कळविले आहे.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत आरटी-पीसीआर 67 जणांचे नमुने घेण्यात आले त्यापैकी 07 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत. म्युकर मायकॉसिसचे एकुण 21 रूग्णांपैकी बारामती तालुक्यातील 14 तर इतर तालुक्यातील 07 रूग्ण आहेत.
काल बारामती तालुक्यातील घाडगेवाडी, कर्हावागज, उंडवडी सुपे येथे एंटिजेन तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये एकूण 194 संशयितांची एंटिजेन तपासणी करण्यात आली त्यामध्ये एकूण 08 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
ज्या नागरिकांचे दुसरा डोस प्रलंबित आहे व पहिला डोस झाल्यानंतर 84 दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच नागरिकांसाठी महिला हॉस्पिटल बारामती व प्राथमिक आरोग्य केंद्र सांगवी या ठिकाणी लसीकरण सुरू आहे.